प्रोटेस्टंट सुधारणा
प्रोटेस्टंट सुधारणा (Protestant Reformation) ही ख्रिश्चन धर्मामधील एक चळवळ होती. मार्टिन ल्युथर, जॉन केल्व्हिन, हल्डरिश झ्विंग्ली व इतर अनेक सुधारकांनी ह्या चळवळीमध्ये भाग घेतला होता. १५१७ साली मार्टिन ल्युथरने आपल्या ग्रंथांमधून कॅथलिक चर्चवर घणाघाती टीका केली होती. हळूहळू ही चळवळ युरोपभर पसरली व जर्मनी, बाल्टिक व स्कॅंडिनेव्हिया प्रदेशांमध्ये ल्युथरन चर्च स्थापण्यात आली. फ्रान्स, नेदरलॅंड्स, स्वित्झर्लंड, हंगेरी इत्यादी राष्ट्रांमध्ये देखील सुधारवादी चर्च सुरू झाली. ह्यामध्येच प्रोस्टेस्टंट धर्माला चालना मिळाली.
![](http://178.128.105.246/cars-http-upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/9/9a/Martin_Luther_by_Cranach-restoration.tif/lossy-page1-250px-Martin_Luther_by_Cranach-restoration.tif.jpg)
कॅथलिक चर्चने प्रोटेस्टंट धर्माचा प्रसार रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले. ह्यामध्येच तीस वर्षांच्या युद्धाची मुळे रोवली गेली.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत