Please enable javascript.

सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपनीला मिळाल्या तब्बल 3600 कोटींच्या ऑर्डर्स; गेल्या एका वर्षात गुंतवणुकदारांना दिला दुप्पट परतावा

Authored by Tushar Sonawane | The Economic Times Marathi | Updated: 29 Jun 2024, 10:18 am

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत नवरत्न डिफेन्स पीएसयूने सांगितले की, त्यांना 3,600 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे.

 
navratna defence psu wins orders worth rs 3600 crore order gives 154 percent returns in 12 months
मुंबई : शुक्रवारी (28 जून) बाजार बंद होण्यापूर्वी नवरत्न डिफेन्स पीएसयू भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) साठी मोठी अपडेट समोर आली. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत नवरत्न डिफेन्स पीएसयूने सांगितले की, त्यांना 3,600 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. शुक्रवारी (28 जून) बीएसईवर शेअर 0.56 टक्क्यांनी वाढून 306.20 रुपयांवर बंद झाला. मल्टीबॅगर डिफेन्स पीएसयूने एका वर्षात भागधारकांना 154 टक्के मजबूत परतावा दिला आहे. (Bharat Electronics Limited)
3600 कोटी रुपयांची ऑर्डर
एक्सचेंज फाइलिंगनुसार, नवरत्न डिफेन्स पीएसयूने शुक्रवारी व्यवसायाच्या शेवटी आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड (AVNL) सोबत 3,172 कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. या प्रकल्पामध्ये भारतीय लष्कराच्या बीएमपी 2/2K रणगाड्यांचे अपग्रेडेशन करण्यासाठी प्रगत, स्वदेशी बनावटीच्या अग्नि नियंत्रण प्रणालीचा पुरवठा आणि स्थापना यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वसमावेशक अभियांत्रिकी सपोर्ट पॅकेजचाही समावेश असेल.

याशिवाय, बीईएलने 22 मे 2024 रोजी डॉप्लर वेदर रडार, क्लासरूम जॅमर, सुटे सामान आणि सेवांसह 481 कोटी किमतीच्या इतर ऑर्डर देखील मिळवल्या आहेत. या ऑर्डरनंतर, बीईएलने आत्तापर्यंत आर्थिक वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत 4,803 कोटींच्या ऑर्डर्स जिंकल्या आहेत. चालू आर्थिक वर्षात कंपनीला 25,000 कोटी रुपयांच्या ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स शेअरची बाजारातील कामगिरी
नवरत्न श्रेणीतील सार्वजनिक कंपनीने आपल्या भागधारकांना बंपर परतावा दिला आहे. गेल्या 3 महिन्यांत शेअर 52 टक्के आणि गेल्या 6 महिन्यांत 67 टक्के वाढला आहे. तसेच, शेअरने 2024 मध्ये 65 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. गेल्या एका वर्षाच्या परताव्याच्या बाबतीत बोलायचे झाले तर 2 वर्षात 154 टक्के आणि 290 टक्के इतका दमदार परतावा दिला आहे. तर शेअर 3 वर्षात 430 टक्के आणि 5 वर्षात 718 टक्क्यांनी वाढला आहे.

इकॉनॉमिक टाइम्स मराठी Business News वेबसाइटवर Share Market च्या ताज्या बातम्या वाचा
Tushar Sonawane यांच्याविषयी
Tushar Sonawane
Tushar Sonawane Digital Content Producer
इकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. डिजिटल, टीव्ही आणि प्रिंट पत्रकारितेत 4 वर्षांचा अनुभव असून राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची विशेष आवड आहे. यापूर्वी 'झी 24 तास' आणि 'सकाळ मीडिया ग्रुप'मध्ये उपसंपादक पदावर काम केले आहे. रानडे इन्स्टिट्यूट पुणे येथून मास मीडियाचे शिक्षण घेतले असून दरम्यान लोकमत पुणे येथे स्टुडंट रिपोर्टर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात करियरला सुरुवात केली.Read More