Please enable javascript.

रिलायन्सचे मार्केट कॅप 21 लाख कोटींवर, हा टप्पा गाठणारी देशातील पहिली कंपनी

Authored by Navnath Bhosale | ET Online | Updated: 28 Jun 2024, 3:45 pm

कंपनीचे मार्केट कॅप 21 लाख कोटी रुपये झाले आहे. हा आकडा गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिली कंपनी बनली आहे. या वर्षी रिलायन्सचे शेअर्स 20 टक्क्यापेक्षा जास्त वाढले आहेत.

 
liance Industries market reached cap Rs 21 lakh crore
मुंबई : शेअर बाजारात शुक्रवारी 28 जून रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 21 लाख कोटी रुपये झाले आहे. हा आकडा गाठणारी रिलायन्स इंडस्ट्रीज भारतातील पहिली कंपनी बनली आहे.
शेअर्स विक्रमी उच्चांकावर
रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 2 टक्के वाढून 3,129 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. त्यामुळे कंपनीचे मार्केट कॅप वाढले आहे. कंपनीने 4 महिन्यांपूर्वी फेब्रुवारी 2024 मध्ये पहिल्यांदाच 20 लाख कोटी रुपयांचा मार्केट कॅप ओलांडला होता. यापूर्वी सप्टेंबर 2021 मध्ये कंपनीने 15 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता. वर्ष 2019 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 10 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले होते.

शेअर्स 20 टक्क्यापेक्षा जास्त वाढले
या वर्षी रिलायन्सचे शेअर्स 20 टक्क्यापेक्षा जास्त वाढले आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला हा शेअर 2590 रुपयांवर होता, तो आता 3129 रुपयांवर पोहोचला आहे. एका महिन्यात शेअर्स 7 टक्के वाढला आहे. 5 वर्षात रिलायन्सच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना 150 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे.

देशातील सर्वात मोठी कंपनी
बाजार भांडवलाच्या बाबतीत रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. मुंबईस्थित रिलायन्स समूह तेलापासून दूरसंचार आणि रिटेलपर्यंतच्या क्षेत्रात काम करतो. यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) येते. टीसीएसचे मार्केट कॅप 14.25 लाख कोटी रुपये आहे.

नफा 1 लाख कोटींच्या पुढे
रिलायन्स इंडस्ट्रीजचा करपूर्व नफा 1 लाख कोटींच्या पुढे गेला आहे. इतका नफा कमावणारी रिलायन्स ही पहिली भारतीय कंपनी आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने आर्थिक वर्ष 2024 (एप्रिल 2023- मार्च 2024) मध्ये 10 लाख कोटी रुपयांचे विक्रमी वार्षिक उत्पन्न नोंदवले आहे.रिलायन्सने 22 एप्रिल रोजी आर्थिक वर्ष 2023-24 च्या चौथ्या तिमाहीचे (जानेवारी-मार्च) निकाल जाहीर केले होते. कंपनीच्या संचालक मंडळाने प्रति शेअर 10 रुपये लाभांशही मंजूर केला होता.


इकॉनॉमिक टाइम्स मराठी Business News वेबसाइटवर Share Market च्या ताज्या बातम्या वाचा
Navnath Bhosale यांच्याविषयी
Navnath Bhosale
Navnath Bhosale Senior Digital Content Producer
इकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये वरिष्ठ डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल पत्रकारितेत 14 वर्षांचा अनुभव. आर्थिक क्षेत्रातील बातम्या, शेअर बाजार, म्युच्युअल फंड विषयांवर लिखाणाची आवड. 'आपलं महानगर' वृत्तपत्रातून करियरला सुरुवात केली. यापूर���वी पुढारी, मी मराठी, नवशक्ती, कृषीवल आदी वृत्तपत्रांमध्ये तसेच मुंबई लाईव्ह, माय महानगर वेबसाईटमध्ये कार्यरत.Read More