Please enable javascript.

'या' आहेत देशातील सर्वात फायदेशीर कंपन्या; परताव्याच्या बाबतीतही अव्वल, तुम्हीचीही गुंतवणूक आहे का?

Authored by Tushar Sonawane | The Economic Times Marathi | Updated: 29 Jun 2024, 6:00 pm

गेल्या वर्षभरात शेअर बाजारात सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर आहे.

 
these listed companies makes more profit than others check list here
मुंबई : भारतीय कंपन्यांसाठी 2023-24 हे आर्थिक वर्ष खूप चांगले राहिले आहे. एका अहवालानुसार आर्थिक वर्ष 2024 मध्ये निफ्टी 50 कंपन्यांचा एकूण नफा 8.14 लाख कोटी रुपये होता. एका वर्षापूर्वी तो 6.39 लाख कोटी रुपये होता. म्हणजेच वार्षिक आधारावर नफ्यात 27 टक्के वाढ झाली आहे. चला जाणून घेऊया कोणत्या टॉप 10 सर्वात फायदेशीर कंपन्या आहेत. आणि त्यांची कामगिरी कशी आहे?
1- रिलायन्स इंडस्ट्रीज(Reliance Industries Ltd)
मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज 78,633 कोटी रुपयांसह सर्वात फायदेशीर कंपनी ठरली. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये गेल्या एका वर्षात 23 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

2- स्टेट बँक ऑफ इंडिया(State Bank of India)
या यादीत एसबीआय दुसऱ्या स्थानावर असून बँकेचा एकूण नफा 68,138 कोटी रुपये झाला आहे. जो मागील वर्षाच्या तुलनेत 20 टक्के अधिक आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शेअरच्या किमती गेल्या 12 महिन्यांत 49 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

3- एचडीएफसी बँक(HDFC Bank Ltd)
या खाजगी बँकेचा एकूण नफा 65,466 कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या नफ्यात वार्षिक आधारावर 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. परंतू त्या तुलनेत बँकेच्या शेअरने गुंतवणुकदारांची निराशा केली आहे. गेल्या 12 महिन्यांत शेअरच्या किमतीत केवळ 2 टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आहे.
4- ओएनजीसी(ONGC)
या सरकारी कंपनीच्या नफ्यात 61 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2024 मध्ये या पीएसयू कंपनीचा नफा 54,705 कोटी रुपये होता. शेअर बाजारातही कंपनीची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. गेल्या 12 महिन्यांत या पीएसयू शेअरची किंमत 70 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचे बाजार भांडवल 14.23 लाख कोटी रुपये आहे.

इकॉनॉमिक टाइम्स मराठी Business News वेबसाइटवर Share Market च्या ताज्या बातम्या वाचा
Tushar Sonawane यांच्याविषयी
Tushar Sonawane
Tushar Sonawane Digital Content Producer
इकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. डिजिटल, टीव्ही आणि प्रिंट पत्रकारितेत 4 वर्षांचा अनुभव असून राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची विशेष आवड आहे. यापूर्वी 'झी 24 तास' आणि 'सकाळ मीडिया ग्रुप'मध्ये उपसंपादक पदावर काम केले आहे. रानडे इन्स्टिट्यूट पुणे येथून मास मीडियाचे शिक्षण घेतले असून दरम्यान लोकमत पुणे येथे स्टुडंट रिपोर्टर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात करियरला सुरुवात केली.Read More