Please enable javascript.

एक दोन नव्हे तब्बल 17 स्टार्ट कंपन्यांमधून अपयशी; 18 व्यांदा पुन्हा घेतली भरारी, अखेर पोहचला यशाच्या शिखरावर

Authored by Tushar Sonawane | The Economic Times Marathi | Updated: 22 Jun 2024, 10:00 am

आयआयटी कानपूरचा विद्यार्थी अंकुश सचदेवाची यशोगाथा लाखो लोकांना प्रेरित करते. त्याने 17 वेळा स्टार्टअप सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्येक वेळी अपयशी ठरले. हार न मानता त्याने 18 व्यांदा पुन्हा प्रयत्न केला आणि शेअरचॅट नावाची कंपनी तयार केली.

 
success story of ankush sachdeva founder of 17 failed startups made rs 40,000 cr business in 18 attempt
नवी दिल्ली : आयआयटी कानपूरचा विद्यार्थी अंकुश सचदेवाची यशोगाथा लाखो लोकांना प्रेरित करते. त्याने 17 वेळा स्टार्टअप सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्येक वेळी अपयशी ठरले. हार न मानता त्याने 18 व्यांदा पुन्हा प्रयत्न केला आणि शेअरचॅट नावाची कंपनी उभारली. आज त्याची किंमत हजारो कोटी रुपयांची झाली आहे. ShareChat हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे लहान शहरे आणि गावांमधील लोकांना जोडण्याचे काम करते.
स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न
आयआयटी पदवीधर त्यांच्या दूरदृष्टी, कठोर परिश्रम आणि आउट ऑफ द बॉक्स विचारांसाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांना मोठ्या कंपन्यांकडून मोठ्या पगारावर नियुक्त केले जाते. आज जगातील अनेक मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रमुख आयआयटी पदवीधर आहेत. तसेच, बहुतेक आयआयटीयन चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांना प्राधान्य देतात. पण, काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करतात. अशाच एका आयआयटी पदवीधराचे नाव आहे अंकुश सचदेवा. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे त्यांचे स्वप्न होते.

17 स्टार्टअप फ्लॉप
अंकुश सचदेवाने आयआयटी कानपूरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले. पदवीनंतर त्यांनी पहिली कंपनी सुरू केली. पण, यश आले नाही. खचून न जाता त्यांनी दुसरी कंपनी सुरू केली. मात्र, तोही प्रयत्न फसला. अशा प्रकारे त्यांनी एकूण 17 स्टार्टअप्स सुरू केल्या पण त्या सर्वांमध्ये त्यांना अपयशच हाती आले.

18व्यांदा नशीब चमकले
18व्यांदा नशिबाने अंकुशला साथ दिली. त्यांनी शेअरचॅट सुरू केले. ShareChat हे एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे जे खास भारतीय लोकांसाठी डिझाइन केलेले आहे. हे व्यासपीठ 15 भाषांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये हिंदी, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी, तेलुगु, तमिळ, बंगाली, ओरिया, कन्नड, आसामी, हरियाणवी, राजस्थानी, भोजपुरी आणि इंग्रजी यांचा समावेश आहे. अंकुश सचदेवाच्या लक्षात आले की भारतातील लहान शहरे आणि गावांमधील लोकांना जोडण्यासाठी त्यांच्या भाषेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची गरज आहे. यामुळेच शेअरचॅटला इतके यश मिळाले.

दोन मित्रांसोबत उभारली कंपनी
Sharechat founder

अंकुश सचदेवाने त्याचे शालेय शिक्षण सोमरविले स्कूलमधून पूर्ण केले. यानंतर त्यांनी आयआयटी कानपूरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले. 2015 मध्ये पदवी प्राप्त करण्यापूर्वी त्यांनी मे ते जुलै 2014 पर्यंत मायक्रोसॉफ्टमध्ये इंटर्निंग केले. 17 वेळा स्टार्टअप सुरू करण्यात अयशस्वी झाल्यानंतर, अंकुशने त्याचे दोन आयआयटीयन मित्र फरीद अहसान आणि भानू सिंग यांच्यासोबत शेअरचॅट ॲप लॉन्च केले. हे ॲप ऑक्टोबर 2015 मध्ये लाँच ��रण्यात आले होते. जून 2022 पर्यंत शेअरचॅटचे मूल्य अंदाजे 5 अब्ज डॉलर म्हणजेच 40,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले होते.

इकॉनॉमिक टाइम्स मराठी Business News वेबसाइटवर MSME बद्दल जाणून घ्या
Tushar Sonawane यांच्याविषयी
Tushar Sonawane
Tushar Sonawane Digital Content Producer
इकॉनॉमिक टाइम्स मराठी' मध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत. डिजिटल, टीव्ही आणि प्रिंट पत्रकारितेत 4 वर्षांचा अनुभव असून राजकीय आणि आर्थिक क्षेत्राची विशेष आवड आहे. यापूर्वी 'झी 24 तास' आणि 'सकाळ मीडिया ग्रुप'मध्ये उपसंपादक पदावर काम केले आहे. रानडे इन्स्टिट्यूट पुणे येथून मास मीडियाचे शिक्षण घेतले असून दरम्यान लोकमत पुणे येथे स्टुडंट रिपोर्टर म्हणून पत्रकारिता क्षेत्रात करियरला सुरुवात केली.Read More