Jump to content

फ्रांसिस्को फ्रांको

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.
फ्रांसिस्को फ्रांको

कार्यकाळ
१ एप्रिल, १९३९ – २० नोव्हेंबर, १९७५
मागील मानुएल अझान्या
पुढील पहिला हुआन कार्लोस

स्पेनचा पंतप्रधान
कार्यकाळ
३० जानेवारी, १९३८ – ८ जून, १९७३
मागील हुआन नेग्रिन
पुढील लुइस कारेरो ब्लांको

जन्म ४ डिसेंबर १८९२ (1892-12-04)
गालिसिया, स्पेन
मृत्यू २० नोव्हेंबर, १९७५ (वय ८२)
माद्रिद, स्पेन
धर्म रोमन कॅथॉलिक
सही फ्रांसिस्को फ्रांकोयांची सही

फ्रांसिस्को फ्रांको (स्पॅनिश: Francisco Franco y Bahamonde) हा स्पेनचा हुकूमशहा होता. स्पेनच्या गृहयुद्धादरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा पुढारी व सेनापती असलेल्या फ्रांकोने युद्धात विजय मिळवल्यानंतर स्पेनमध्ये हुकूमशाही राजवट स्थापन केली व तो मृत्यूपर्यंत स्पेनचा राष्ट्रप्रमुख राहिला.

गृहयुद्धामध्ये नाझी जर्मनीइटलीने फ्रांकोला लष्करी मदत पुरवली असतानाही फ्रांकोने दुसऱ्या महायुद्धादरम्यान अक्ष राष्ट्रांना मदत न करता तटस्थ राहणे पसंद केले. युद्ध संपल्यानंतर फ्रांकोने आपली स्पेनवरील पकड मजबूत ठेवण्यासाठी अनेक राजकीय विरोधकांना छळछावण्यांमध्ये डांबले तसेच त्याच्या राजवटीविरुद्ध आवाज उठवणाऱ्या व्यक्तींना मृत्यूची शिक्षा ठोठावली. त्याच्या कट्टर कम्युनिस्टविरोधी धोरणांमुळे शीत युद्ध काळात अमेरिकेने फ्रांको सरकारसोबत लष्करी व वाणिज्य संबंध प्रस्थापित केले होते.

फ्रांकोच्या मृत्यूनंतर स्पेनने लोकशाही राजवटीकडे वाटचाल करण्यास सुरुवात केली व इ.स. १९७८ साली लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सत्तेवर आले.

बाह्य दुवे