Jump to content

पहिला बायेझिद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पहिला बायेझिद
बायेझिदची राजकीय मुद्रा (तुग्रा)

पहिला बायेझिद (१३५४ – ८ मार्च १४०३; ओस्मानी तुर्की: بايزيد اول,; तुर्की: Beyazıt) हा इ.स. १३८९ ते १४०२ दरम्यान ओस्मानी साम्राज्याचा सुलतान होता. पहिल्या मुरादचा मुलगा असलेला बायेझिद मुरादच्या कोसोव्होमधील मृत्यूनंतर सुलतान बनला.

१३८९ ते १३९५ दरम्यान बायेझिदने बल्गेरियाग्रीसवर अधिपत्य मिळवले. १३९५ साली त्याने बायझेंटाईन साम्राज्याची राजधानी कॉंस्टॅंटिनोपोलला वेढा घातला. बायझेंटाईन सम्राट दुसऱ्या मॅन्युएलच्या मदतीसाठी हंगेरीचा सम्राट व पवित्र रोमन साम्राज्याचा सेनापती सिगिस्मंड धावून आला परंतु बायेझिदच्या सैन्याने त्याचा पराभव केला. इ.स. १४०० साली मध्य आशियातील तैमूरलंगने तुर्कांवर आक्रमण केले व अंकारा येथे झालेल्या लढाईदरम्यान बायेझिद पकडला गेला.

ओस्मानी सुलतान शत्रूकडून पकडला जाण्याची ही पहिलीच वेळ होती. तैमूरांच्या कैदेत असतानाच बायेझिदचा १४०३ साली मृत्यू झाला. त्याच्या पश्चात त्याच्या ४ मुलांमध्ये सत्तेवरून अनेक लढाया झाल्या व पुढील १० वर्षे ओस्मानी साम्राज्याला सुलतान नव्हता. ह्यामुळे साम्राज्याची वाढ खुंटली.