Jump to content

बल्गेरिया क्रिकेट संघाचा सर्बिया दौरा, २०२२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बल्गेरिया क्रिकेट संघाचा सर्बिया दौरा, २०२२
सर्बिया
बल्गेरिया
तारीख ८ – १० जुलै २०२२
संघनायक रॉबिन विटास प्रकाश मिश्रा
२०-२० मालिका
निकाल सर्बिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा सिमो इवेटिक (१४९) ओमर रसूल (१६०)
सर्वाधिक बळी ॲलिस्टेर गॅजिक (७) ह्रिस्तो लाकोव (४)

बल्गेरिया क्रिकेट संघाने जुलै २०२२ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सर्बियाचा दौरा केला. जूनमध्ये सर्बियाने बल्गेरियाचा दौरा केल्यानंतर बल्गेरियाने दौऱ्याची परतफेड म्हणून सर्बियाचा दौरा केला. सदर मालिका २०२२-२३ आय.सी.सी. पुरुष ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक युरोप पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी खेळवली गेली. तसेच सर्बियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० क्रिकेट सामने खेळविण्यात आले.

सर्बियाने पहिले दोन्ही सामने जिंकत मालिकाविजय निश्चित केला. सर्बियाने बल्गेरियाविरुद्ध पहिल्यांदाच ट्वेंटी२० मालिका जिंकली. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात बल्गेरियाने ९५ धावांनी विजय मिळवला. सर्बियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका २-१ ने जिंकली.

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

८ जुलै २०२२
१०:००
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
१५२/९ (२० षटके)
वि
सर्बियाचा ध्वज सर्बिया
१५५/३ (१८.२ षटके)
प्रकाश मिश्रा ५५ (३२)
ॲलिस्टेर गॅजिक ३/२६ (३ षटके)
सिमो इवेटिक ६५* (५७)
प्रकाश मिश्रा १/१८ (४ षटके)
सर्बिया ७ गडी राखून विजयी.
लिसीजी जियाराक मैदान, बेलग्रेड
पंच: ड्रॅगन जोकिच (स) आणि इव्हान दिमित्रोव्ह (ब)
सामनावीर: अयो मीन-एजिगे (सर्बिया)‌
  • नाणेफेक : सर्बिया, क्षेत्ररक्षण.
  • सर्बियामध्ये खेळवला गेलेला पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • बल्गेरियाने सर्बियामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • सर्बियाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये बल्गेरियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • ॲलिस्टेर गॅजिक, मार्क पाव्हलोविक, सिमो इवेटिक (स) आणि तरुण यादव (ब) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

९ जुलै २०२२
१०:००
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
१५४/९ (२० षटके)
वि
सर्बियाचा ध्वज सर्बिया
१५७/२ (१९.३ षटके)
ओमर रसूल ६१ (४०)
ॲलिस्टेर गॅजिक ४/१२ (४ षटके)
सिमो इवेटिक ६१* (४४)
प्रकाश मिश्रा १/२४ (४ षटके)
सर्बिया ८ गडी राखून विजयी.
लिसीजी जियाराक मैदान, बेलग्रेड
पंच: ड्रॅगन जोकिच (स) आणि इव्हान दिमित्रोव्ह (ब)
सामनावीर: विंट्ले बर्टन (सर्बिया)
  • नाणेफेक : सर्बिया, क्षेत्ररक्षण.

३रा सामना[संपादन]

९ जुलै २०२२
१५:००
धावफलक
बल्गेरिया Flag of बल्गेरिया
२०६/५ (२० षटके)
वि
सर्बियाचा ध्वज सर्बिया
१११ (१८.५ षटके)
ओमर रसूल ९९* (५६)
मातिजा सॅरेनाक १/१७ (३ षटके)
सिमो इवेटिक २३ (११)
ह्रिस्तो लाकोव ३/२१ (४ षटके)
बल्गेरिया ९५ धावांनी विजयी.
लिसीजी जियाराक मैदान, बेलग्रेड
पंच: ड्रॅगन जोकिच (स) आणि इव्हान दिमित्रोव्ह (ब)
सामनावीर: ओमर रसूल (बल्गेरिया)
  • नाणेफेक : सर्बिया, क्षेत्ररक्षण.
  • सचिन शिंदे (स) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.