Jump to content

रंगनायकी जयरामन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रंगनायकी जयरामन
आयुष्य
जन्म १९ सप्टेंबर १९३५
जन्म स्थान विलुपुरम, तमिळनाडू, भारत
मृत्यू १ डिसेंबर २०२१ [१]
व्यक्तिगत माहिती
नागरिकत्व भारतीय
देश भारत
गौरव
पुरस्कार संगीत नाटक अकादमी पुरस्कार

रंगनायकी जयरामन (१९ सप्टेंबर,१९३५: विलुपुरम, तमिळनाडू, भारत ) या एक अनुभवी भरतनाट्यम नृत्यांगना आहेत. नृत्य क्षेत्रातील योगदानाबद्दल श्रीमती रंगनायकी यांना २०१५ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.[२]

ओळख[संपादन]

१९ सप्टेंबर १९३५ रोजी तामिळनाडूमधील विलुपुरम जिल्ह्यात जन्मलेल्या श्रीमती रंगनायकी जयरामन यांनी श्री सरस्वती गण निलयम येथे श्रीमती के. ललिता यांच्याकडे भरतनाट्यमचे प्रशिक्षण घेतले. तसेच चेन्नईच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ म्युझिकमध्ये प्रोफेसर पी. सांबामूर्ती यांच्याकडून संगीताचे प्रशिक्षणही घेतले आहे. भरतनाट्यमचे अग्रगण्य प्रवर्तक, श्रीमती रंगनायकी जयरामन यांनी नृत्यांगना आणि शिक्षिका म्हणून नावलौकिक मिळवला आहे. भरतनाट्यमच्या तंजावर आणि पंडनल्लूर या दोन्ही शैलींमध्ये विशेष करून त्या सुप्रसिद्ध नट्टुवन्नर देखील आहे.[३]

कारकीर्द[संपादन]

श्रीमती रंगनायकी यांनी यूएसए आणि मध्य पूर्व देशांसह आणि परदेशातील प्रमुख नृत्य महोत्सवांमध्ये विविध मैफिली आणि चर्चासत्रे आणि कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. नृत्यदिग्दर्शन निर्मिती म्हणून शक्ती प्रभावम, शिव प्रभावम, वाचमाकोचम, नौकाचारीहम, अष्टपथी आणि कुरावंजी मध्ये योगदान आहे. श्रीमती रंगनायकी जयरामन यांनी सात दशकांहून अधिक काळ भरतनाट्यम नृत्याचे प्रशिक्षण दिले आहे आणि त्यांचे अनेक विद्यार्थी आता सुप्रसिद्ध कलाकार बनले आहेत.[४] तिने म्युझिक अकादमी, चेन्नई येथे देखील शिकवले आहे आणि १९९२ पासून चेन्नई येथील श्री सरस्वती गण निलयम या तिच्या गुरूच्या संस्थेच्या संचालक म्हणून काम करत होत्या.[५]

पुरस्कार[संपादन]

भरतनाट्यम क्षेत्रातील योगदानाबद्दल तिच्या असामान्य क्षमतेसाठी, श्रीमती रंगनायकी जयरामन यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. तामिळनाडू इयाल इसाई नाटक मनरम द्वारे बहाल केलेली कलईमामणी पुरस्कार (१९९५), कार्तिक ललित कला द्वारे प्रदान केलेले नाट्य दर्शन पुरस्कार (२००६) , भरत कलाचर द्वारे आचार्य कला भारती पुरस्कार (२००७) आणि भारतीय विद्या भवन द्वारे नृत्यरत्न पुरस्कार (२०११). भरतनाट्यममधील योगदानाबद्दल श्रीमती रंगनायकी जयरामन यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आणि ABHAI द्वारे २०१२ मध्ये नाट्य कलानिधी पुरस्कार मिळाला आहे.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Bharatanatyam Guru Ranganayaki Jayaraman passed away". narthaki.com (इंग्रजी भाषेत). 1 December 2021. 8 June 2023 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 February 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "President Presents Sangeet Natak Akademi Fellowships and Sangeet Natak Akademi Awards for the Year-2015". pib.gov.in (इंग्रजी भाषेत). 4 October 2016. 24 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 February 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Ranganayaki Jayaraman" (PDF). Sangeetnatak.gov. in (इंग्रजी भाषेत). 1 February 2024. 28 June 2022 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 1 February 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "When colour accentuated the mood". thehindu.com (इंग्रजी भाषेत). 3 January 2011. 16 May 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 February 2024 रोजी पाहिले.
  5. ^ "Neighbourhood dance school reaches a milestone". thehindu.com (इंग्रजी भाषेत). 10 October 2015. 18 January 2022 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 February 2024 रोजी पाहिले.
  6. ^ "Governor lauds artiste's association". newindianexpress.com (इंग्रजी भाषेत). 17 November 2012. 1 February 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 1 February 2024 रोजी पाहिले.