Jump to content

रीटा विल्यम्स-गार्सिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रीटा विल्यम्स गार्सिया (जन्म १९५७) या अमेरिकन लेखिका आहेत, ज्या मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी कादंबरी लेखन करतात. २०१० साली नॅशनल बुक अवॉर्ड्सच्या अंतिम यादीमध्ये त्यांच्या ‘जंप्ड’ या कादंबरीचा समावेश होता. त्यांच्या वन क्रेझी समर या पुस्तकाने २०११ साली न्यूबेरी ऑनर अवॉर्ड, [१] कोरेटा स्कॉट किंग अवॉर्ड, [२] [३] आणि आणि इतिहासावर आधारित काल्पनिक कथेसाठी दिला जाणारा स्कॉट ओ'डेल अवॉर्ड हे अवॉर्ड्स जिंकले.. त्यांना पेन/ नॉर्मा क्लाईन अवॉर्डही मिळाला आहे. [४] [५] २०१३ साली लिहिलेल्या पी.एस. बी इलेव्हन या त्यां���्या पुस्तकाची ज्युनिअर लिटररी गिल्डसाठी निवड झाली होती. तसेच ते न्यू यॉर्क टाईम्स एडिटर्स चॉइस बुक ठरले. तर याच पुस्तकाने २०१४ सालचा कोरेटा स्कॉट किंग अवॉर्ड जिंकला. २०१६ सालचा कोरेटा स्कॉट किंग अवॉर्ड त्यांच्या गॉन क्रेझी इन अलाबामा या पुस्तकाने जिंकला. २०१७ साली नवतरुणांच्या साहित्यासाठी दिल्या जाणाऱ्या नॅशनल बुक अवॉर्डच्या अंतिम यादीमध्ये त्यांच्या क्लेटन बर्ड गोज अंडरग्राउंड या पुस्तकाचा समावेश होता.

जीवन[संपादन]

रीटा विल्यम्स गार्सिया यांचा जन्म न्यू यॉर्कमधील क्वीन्स येथे झाला. त्यांचे वडील लष्करात होते. हॉफस्ट्रॉ विद्यापीठातून १९८० साली त्यांनी पदवी शिक्षण पूर्ण केले. हॉफस्ट्रॉ मध्ये त्या रिचर्ड प्राईस आणि सोनिया पिल्सर यांच्यासोबत शिक्षण घेत होत्या. त्या न्यू यॉर्कमधील जमैका येथे राहतात. व्हरमाँट कॉलेज ऑफ फाईन आर्ट्समध्ये त्या अनेक वर्षे शिकवत होत्या.[६]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Newbery Medal Home Page". Association for Library Service to Children. 2011. 2011-04-17 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "Coretta Scott King Book Awards". American Library Association. 2011. 2011-04-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-04-17 रोजी पाहिले.
  3. ^ "Press Releases | News & Press Center". Americanlibrariesmagazine.org. 2012-03-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-16 रोजी पाहिले.
  4. ^ Rita Williams-Garcia (2010-03-24). "Rita Williams-Garcia from HarperCollins Publishers". Harpercollins.com. 2014-02-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-16 रोजी पाहिले.
  5. ^ "Rita Williams-Garcia", PEN American Center, Archived 2012-08-18 at the Wayback Machine.
  6. ^ "In Focus: Rita Williams-Garcia - Hofstra College of Liberal Arts & Sciences | Hofstra University". Hofstra.edu. 2014-02-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-16 रोजी पाहिले.