Jump to content

शानिदार गुहा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
शानिदार गुहा

शानिदार गुहा ही उत्तर इराकमधील झाग्रोस पर्वतात समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर असून तिचे क्षेत्रफळ ११७०० चौरस फूट व छत ४५ फूट उंचीवर आहे. या गुहेचा शोध डॉ. राल्फ सोलेकी यांनी इ.स. १९५१ साली लावला. डॉ. सोलेकी यांनी या गुहेमध्ये इ.स. १९५७ ते इ.स. १९६१ या कालावधीत उत्खनन केले.

उत्खनन[संपादन]

इ.स.पूर्व एक लक्ष वर्षे ते इ.स.पू. ७००० वर्षे या काळातील मानवी वस्त्यांचा इतिहास या शानिदार गुहेच्या उत्खननात उपलब्ध झाला. येथील उपलब्ध पुराव्यानुसार या गुहेत एक लाख वर्षांपूर्वी निॲन्डरथल मानव राहत होता हे सिद्ध झाले. यानंतरही नवाश्मयुगापर्यंत या गुहेत मानवाने वस्ती केली होती. येथील उत्खननात एकूण नऊ मानवी सांगाडे सापडले. यातील पहिल्या क्रमांकाचा सांगाडा प्रौढ निॲन्डरथल मानवाचा असून तो 'शानिदार १' किंवा नॅन्डी या नावाने ओळखला जातो. या सांगाड्याचे वय मृत्यूसमयी ४० ते ५० वर्षांचे होते व हा सांगाडा ३५००० ते ४५००० वर्षे जुना आहे.[१] दुसऱ्या प्रौढ सांगाड्याची कवटी व हाडे भुगा झालेल्या स्वरूपात मिळाली. 'शानिदार ४' नावाने ओळखला जाणारा चौथा सांगाडा डॉ. राल्फ सोलेकी यांना इ.स. १९६० साली उत्खननात प्राप्त झाला त्याचे वय मृत्यूसमयी ३० ते ४५ वर्षांचे असून या निॲन्डरथल मानचाचा काळ इ.स.पू. ६०००० ते इ.स.पू. ८०००० वर्षे इतका जुना आहे.[२]

सुमारे ४५००० वर्षांपूर्वी भूकंपामुळे या गुहेची पडझड झाली. त्यात जो मानव पुरला गेला त्याची हत्यारे मूस्तेरीयन पद्धतीची होती. सुमारे सात हजार वर्षांपूर्वी नवाश्मयुगीन मानव या गुहेत राहायला आल्याचा पुरावाही उत्खननातून मिळाला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "शानिदार १" (इंग्रजी भाषेत). 2013-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "द स्केलेटन ऑफ शानिदार केव्ह" (इंग्रजी भाषेत). 2013-07-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ९ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)